राज्यात गेल्या काही दिवसापासूंन पावसाने थैमान घातले आहे. मात्र आज देखील राज्यात पावसाची आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी अति हलका ते हलका पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील ४८ तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळ ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. विशेषतः नाशिक अहमदनगर पुणे औरंगाबाद बीड अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ व जळगाव जिल्हा प्रभावित राहतील. पुढील ४८ तास राज्यासाठी महत्वाचे असतील.