दुकानांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक असल्याचा आदेश महापालिकेने काढत विक्रेत्यांना मराठी पाट्या लावण्याचे सूचना दिल्या आहेत.मात्र महापालिकेने मराठी पाट्या बाबत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा मनेसकडून देण्यात आला होता.
दरम्यान मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यानंतर इंग्रजी पाट्यांविरोधात राज्यभरात मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहेत . आज मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली जंगली महाराज रोडवरील हॉटेल, दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्यांविरोधात आंदोलन करण्यात आले. तर यावेळी दुकानांवर दगडफेक करीत बोर्ड फोडण्यात आले.
जंगली महाराज रोडवरील अनेक दुकानावरती इंग्लिश पाट्या आहेत. जंगली महाराज रोडवर अनेक ब्रॅण्ड, कपड्याची दुकाने असून यांच्या पाट्या मराठीत करा अशी मनसेची मागणी आहे. यावेळी काही दुकानांचे इंग्रजीत असलेले फलक मनसेकडून फॊडण्यात आले.