उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. “मार्च 2024 मध्ये पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक जाहीर होतील, असा माझा अंदाज आहे. सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे अशी घोषणा पवारांनी केली आहे. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिबीर सुरु आहे.
बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोत. सध्या या जागा आपल्याकडे आहे. परंतु इतर काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.