राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतच्या शिबिरात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकारमध्ये भाजपसोबत जा ,मी राजीनामा देतो असे स्वतः शरद पवारच म्हणाले होते, असा धक्कादायक खुलासा अजित पवार यांनी केला आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वांबरोबर चर्चा करुन घेतला होता . चर्चेत सुप्रिया सुळे आणि जयंत पाटीलही होते, मग त्यानंतर शरद पवार यांनी आम्हाला गाफिल का ठेवले असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार मला एक सांगत होते आणि करत वेगळेच होते.जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांची घरी मीटिंग झाली आणि दुसऱ्या दिवसापासुन आंदोलन सुरू झाले. शरद पवार यांची सातत्याने धरसोड वृत्ती होती. असा खुलासा अजित पवार यांनी बोलताना केला आहे.
आपली राष्ट्रवादी हीच मूळ राष्ट्रवादी आहे. सगळ्यांच्या आशिर्वादानं पुढे चला मात्र मात्र आपल्याला कुणाची बदनामी करायची नाही, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.