1 डिसेंबर हा दिवस दर वर्षी जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो.
एड्स या आजारासंबंधी जागरूकता वाढवणे, एड्स या साथीच्या संसर्गाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एचआयव्ही विरुद्ध लढ्यात सहभागी होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. एड्स हा रोग ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) द्वारे होतो. एचआयव्ही शरीरातील रोगप्रतिकारक पेशी नष्ट करतो किंवा त्याचे नुकसान करतो. लक्षणे : एड्सची पहिली लक्षणे म्हणजे इन्फ्लूएंझा (फ्ल्यू) सारखी लक्षणे किंवा सूजलेल्या ग्रंथी असू शकतात. परंतु काही वेळा लक्षणे दिसू शकत नाहीत. दोन किंवा तीन महिन्यांनंतर लक्षणे दिसू शकतात. घसा खवखवणे, स्नायू दुखणे, पुरळ, तोंड किंवा जननेंद्रियाचा अल्सर, डोकेदुखी, ताप, मुख्यत: माने वर सूजलेल्या लसिका ग्रंथी, सांधेदुखी, अतिसार, रात्री घाम येणे इत्यादी लक्षणे असू शकतात.
*एड्स होण्याची कारणे एखाद्या व्यक्तीस अनेक मार्गांनी एचआयव्ही / एड्सची लागण होऊ शकते .
*रक्त संक्रमण:* काही रुग्णांमध्ये रक्त संक्रमणाद्वारे व्हायरस संक्रमित होऊ शकतो. एकच इंजेक्शन अनेकांना वापरणे. संक्रमित रक्ताने दूषित झालेल्या सुया आणि सिरिंजच्या माध्यमातून एच्आयव्ही विषाणू संक्रमित होऊ शकतो.
*लैंगिक संपर्कः* एच्आयव्ही संक्रमण ज्यामुळे अधिक पसरते ते प्रमुख कारण म्हणजे अनेकांशी लैंगिक संपर्क होय.
*आईपासून मुलापर्यंत एचआयव्ही विषाणूची लागण असलेली गर्भवती महिला त्यांच्या सामायिक रक्त परिसंचरणातून तिच्या गर्भा मध्ये व्हायरस संक्रमित करू शकते किंवा संक्रमित आई आपल्या दुधातून आपल्या बाळामध्ये विषाणू संक्रमित करू शकते.
*या गोष्टी करण्याने एड्स होत नाही : हात मिळवणे, मिठी मारणे, चुंबन, शिंका येणे, त्वचेला स्पर्श करणे, समान शौचालय वापरणे, एकच टॉवेल वापरणे, एचआयव्ही ग्रस्त व्यक्तीचे लाळ, अश्रू, मल आणि मूत्र याद्वारे एचआयव्ही पसरत नाही.*
*प्रतिबंध आणि नियंत्रण जनतेत जनजागृती करणे. कंडोमच्या वापराद्वारे संरक्षित लैंगिक संपर्कामुळे एच्आयव्ही / एड्सचा धोका कमी होतो. *सुरक्षित इंजेक्शन्स: ऑटो डिस्पोजल सिरिंज वापरल्याने एचआयव्ही संसर्ग रोखण्यास मदत होते. केवळ *अधिकृत* व *मान्यताप्राप्त* रक्तपेढ्यांमधूनच सुरक्षित रक्त संक्रमण (Blood Transfusion ) केले जावे. *बाळाचे संक्रमणा पासून रक्षण करण्यासाठी* एच्आयव्ही पॉझिटिव्ह गर्भवती आईचे समुपदेशन करावे .
अशा प्रकारे योग्य ती काळजी घेऊन आणि संतुलित आहार विहार यांचे पालन करून आपली प्रतिकारशक्ती उत्तम ठेवली तर एड्स सारख्या जीवघेण्या आजाराचे निर्मूलन करणे सहज शक्य होईल . यासाठी आयुर्वेदात उल्लेख केलेली अनेक प्रभावी औषधे जी रसायन म्हणून काम करतात त्यांच्या उपयोगाने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होऊ शकते.
वैद्य सौ नेहा नचिकेत वाचासुंदर ,
वैदेही शाखा-कराड…
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र