महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली आहे. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील हेही उपस्थित होते. या भेटीत राज्यातील टोल नाके आणि दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे मराठी पाट्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठी पाट्या लावण्याबाबत २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण,अद्यापही काही ठिकाणी मराठी पाट्या लावण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मनसेकडून मुंबई, पुणे आणि विविध ठिकाणी तोडफोड करण्यात येत आहे.
अशातच राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.