पुण्यात सध्या होत असलेल्या शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जे काही घडले त्याची चिंता करण्याची गरज नाही, विधानसभा जाहीर होतील तेव्हा राष्ट्रवादीची नवी फळी तयार होणार आहे. असे म्हणत काल अजित पवार यांनी केलेल्या आरोपांवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे.
लोकसभेची निवडणूक ३ ते ४ महिन्यावर आली आहे, कामाला लागा, तुम्हा सर्वांना नवीन संधी मिळाली आहे. जो काही विचार असेल तो शेवटपर्यंत पोहचवण्याचे काम करूया. नेतृत्वाची नवी फळी तयार करण्याची तुमच्यात क्षमता आहे. असा कानमंत्र शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
काल कर्जत येथील राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये शरद पवार यांच्यावर थेट आरोप करत अजित पवार यांनी हल्लाबोल केला होता. त्यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आज थोड्याच वेळात शरद पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद देखील होणार आहे.