यंदा छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकास 350 वर्षे पूर्ण झाली आहेत.आजही शिवरायांच्या आरमार दलाची आठवण ताजी आहे.
1674ला नौसेना स्थापन करणारे शिवराय,भारतीय नौदलाचे जनक मानले जातात. त्याकाळात त्यांच्या आरमारात 500 जहाजे होती.जसे अश्वदल पृथ्वीतलावर तसे नौदल समुद्रावर हवेच.सागरी किनाऱ्यावरून होणाऱ्या शत्रूच्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी आरमार असावेच. त्यावेळी त्यांची 500जहाजे आरमारात होती जी शत्रूची झोप उडवत..
सागरी मार्गे येवून जनतेला त्रास देणा-या,पोर्तुगीज, ब्रिटिश,चाचेगिरी करणारे समुद्री लुटारू याना शह बसविण्यास “शिवरायांच्या” आरमारास मोठे यश प्राप्त झाल होते.
यामुळेच कोकण, गोवा यांची सुरक्षिततेबाबत काळजी घेण्यात शिवराय यशस्वी झाले.त्याकाळात भिवंडी,कल्याण, गोवा येथे जहाज बांधणीचे व्यवसाय सुरू केले गेले.17व्या शतकातील “समुद्र शिवाजी ” म्हणून ओळख असणा-या सरखेल “कान्होजी आंग्रे” “या सागरी क्रांतिकारकास कोण बरे विसरेल ..त्याकाळात त्यानी विजयदुर्ग ला नाविकतळ उभारला होता तर मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी करण्यासाठी व कर वसुलीसाठी आणि परकियांना शह बसण्यासाठी खांदेरी उंदेरी बेटा वर तळ उभे केले होते. अलिबाग येथील आरमार नेव्हल कमांड तळास INS आंग्रे हे नाव देण्यात आले आह
कोकण किनारपट्टीचा” जागता पहारा”…म्हणजे ..”कान्होजी.आंग्रे.”.
.आपला भारत देश तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेला देश आहे.त्यामुळेच नौदलाची म्हणजेच नौसेनेची अत्यंत आवश्यकता आहे.भारतीय नौदल ( IN)ही सशस्त्र दलांची सागरी शाखा आहे.भारताचे माननीय “राष्ट्रपती” हे भारतीय नौदलाचे सर्वोच्च कमांडर आहेत.स्वतंत्र भारताचे पहिले नौदल प्रमुख श्री .रामदास कटारी होते.भारतीय नौदलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.आज नौदलात 1लाख,बेचाळीस हजार,नऊशे वीर सैनिक कार्यरत आहेत . मा.पंतप्रधान मोदिजींच्यामुळे लाल क्राॅसचा गुलामीचा ध्वज बंद होवून,पांढऱ्याशुभ्र ध्वजावर आता भारताचा ध्वज व *शं नो वरूणः* ह्या अक्षरानी सुशोभित असा नौसेनेच्या पराक्रमाचा व शौर्याचा ध्वज समुद्रावरील आसमंतात नौदलाच्या जहाजांवर डौलाने फडकत आहे.
डिसेंबर 1971च्या सागरी युध्दात पाकिस्तान च्या “गाझी”बोटीला गनिमी काव्याने हरवून समुद्रतळ दाखवणा-या आपल्या नौदलाच्या पराक्रमाचे,व 4डिसेंबर 1971च्या बंगालच्या उपसागरात पाकिस्तान वर ऑपरेशन प्रायडेंट म्हणजे भगवान शंकराचे त्रिशूलाप्रमाणे पाकच्या कोचीन बंदरात शिरून पाकिस्तान चे कंबरडे मोडण्यात यश मिळवणा-या INS विक्रांतच्या, भारतीय नौदलाच्या ,कौतुकास्पद दिवसाचे व कर्तबगारीचे स्मरण म्हणजेच 4डिसेंबर हा दिवस
“भारतीय नौसेना दिन…”
जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा ….
आपल्या महाराष्ट्राची अस्मिता उंचावणारी गोष्ट म्हणजे उद्या सोमवारी 4डिसेंबर 2023 रोजी कोकण प्रांतातील मालवण येथील मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणा-या अभेद्य अश्या सिंधुदुर्ग किल्यावर यावर्षीचा भारतीय “नौसेना दिन” साजरा होणार आहे.या सोहळ्यास मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी व मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदिजी उपस्थित राहणार आहेत.70लढाऊ जहाजे यात भाग घेतील.राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मा.मोदींजींच्या हस्ते होईल.
सौ.माधुरीताई कुलकर्णी .
मैत्रेयी शाखा,
विद्यानगर, कराड…
सौजन्य – समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र