पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे उपस्थित होते. सिंधुदुर्गच्या समुद्र किनारी राजकोट किल्ल्यावर भारतीय नौदलाचे जनक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा ४३ फुट उंच पुतळा उभारण्यात आला आहे
पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्ट गॅलरीची देखील पाहणी केली.