महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले नौदल दिनाच्या निमित्तानेच आज विविध कार्यक्रमांचं आयोजन सिंधुदुर्गात करण्यात आले आहे. या नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि भारतीय नौदल आता आपल्या पदांची नावे भारतीय पंरपरेनुसार देणार असल्याच्या दोन मोठ्या घोषणा पंतप्रधान मोदींनी यावेळी केल्या आहेत.
तसेच सिंधुदुर्ग हे शिवरायांच्या सामर्थ्याचे प्रतीक असून , त्यांच्या काळातले समुद्री सामर्थ्य आपल्याला परत कमवायचे आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले आहेत.
आजचा भारत आपल्यासाठी मोठे लक्ष्य निश्चित करत आहे. ते मिळवण्यासाठी पूर्ण शक्ती लावत असून भारताजवळ या लक्ष्यांना पूर्ण करण्यासाठी एक मोठी ताकद आहे. ही ताकद १४० कोटी भारतीयांच्या विश्वासाची आहे”, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.