खालिस्तांनी अतिरेकी लखबीर सिंग रोडे याचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. रोडे ७२ वर्षाचा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितले जात आहे.
लखबीर सिंग रोडे हा दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा पुतण्या होता आणि भारताकडून जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत देखील त्याचा समावेश होता. लखबीर सिंग रोडे बंदी घालण्यात आलेली संघटना खलिस्तान लिबरेशन फोर्स आणि इंटरनॅशनल सिख यूथ फेडरेशन चा प्रमुख होता.
रोडे याच्यावर स्थानिक गँगस्टर्सच्या मदतीने पंजाबमध्ये अनेक हल्ले केल्याचा आरोप आहे. या वर्षाच्या सुरुवातीला एनआयएने मोगा जिल्ह्यातील लखबीर सिंग रोडे याच्या मालकीची जमीनही जप्त केली होती.रोडे याच्यावर भारतात अनेक हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे.