कार्तिक वद्य ८ , कालाष्टमी
आज मंगळवार दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी श्री कालभैरवनाथमहाराज जयंती आहे ‼️
असा झालाअवतार: –
एकदा अगस्त्यऋषींनी कार्तिकेय स्वामींनाविचारले की 33 कोटी देवात सर्वश्रेष्ठ कोण आहे त्यावेळी सुमैरू पर्वतावर घडलेली अवतार कथा घटना त्यांनी ऋषींना सांगितली. ती अशी:— सर्व ऋषीमुनी या पर्वतावर जमले असता त्यांनी ब्राम्हदेवास प्रश्न केला की सर्व देवात सर्वश्रेष्ठ कोण? तेव्हा भगवान विष्णू व ब्रह्मदेवात श्रेष्ठत्वा वरून वाद झाला. त्यावेळी सर्व चार वेदांचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी मात्र श्री शिवशंकर सर्वश्रेष्ठ आहेत असे सांगितले. ते ऐकून दोघे देव शिव निंदा करू लागले. तेव्हा श्री शिवशंकरास भयंकर क्रोध उत्पन्न होऊन भैरव उत्पन्न झाला. त्यास कालभैरव असे म्हणतात. त्यास आमर्दक पापरक्षण कालराज असेही म्हणतात. त्याने उत्पन्न झाल्याबरोबर आपल्या डाव्या करंगळीच्या नखाने ब्रम्हदेवाचे शिवाची निंदा करणारे पाचवे मस्तक तोडले.. दोन्ही देवांनी यावेळी कालभैरवाची स्तुती केली श्री शिवशंकराने सांगितले की श्री कालभैरव माझा अंशावतार आहे.
श्री शिवशंकराच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते मस्तक हातात घेऊन ब्रम्ह हत्येचे पातक दूर व्हावे म्हणून अनेक तीर्थक्षेत्री यात्रा केली परंतु जेव्हा काशी क्षेत्री प्रवेश केला त्यावेळीं ब्रम्हहत्ये पासून मुक्ती मिळाली. त्याचवेळी ते मस्तक त्यांच्या हातून खाली पडले तेच स्थान कपालमोचन म्हणून प्रसिद्ध झाले. या वेळी भगवान शंकराने त्यास काशी क्षेत्राचा मुख्यकोतवाल म्हणून राहण्याची आज्ञा केली.त्याच कपालमोचन स्थळी आताचे श्रीकालभैरव मंदीर आहे.याच्या दर्शनाशिवाय श्री काशी यात्रा पूर्ण होत नाही.*
महाकाळ बटुकभैरव व स्वर्णकर्षण भैरव ही तीन मुख्य स्वरूपे म्हणजे साक्षात शिवशंकरच आहेत.तसेच क्षेत्रपाल ईशान चंडेश्वर मृत्युंजय मंजुकोष अर्धनारीश्वर नीलकंठ दंडपाणी व दक्षिणामुर्तीवीर हे अवतार शंकराचेच आहेत.*
भैरवांची एकूण संख्या 64 असून त्यातील 8 भैरव हे 8 दिशांचे रक्षक समजले जातात. त्यांचे 8 गट हे दिवसाच्या 8 प्रहराचे पहारेकरी असतात.
*महाराष्ट्रातील जागृत स्थाने*
********-********-*****
1 रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन जवळ हरिहरेश्वर येथे.*
2) #पुणे येथील कसबा पेठ येथे मंदीर (325 वर्षांपूर्वीचे).*
3)*#ठाणे येथील पुरातन कौपीनेश्वर मंदिराच्या आवारात.*
4)मुलुंड (पूर्व) येथे खंडोबा मा मंदीरात.
4)रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण येथील मुर्ती.
5) *जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील मंदीर
सौ अनुजा ग्रामोपाध्ये
कराड
सौजन्य – समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र