मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात ही सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत युक्तिवाद होणार नाही. फक्त 3 न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीश उपस्थित राहणार आहेत. दालनात आज केस पुढे चालवायची की नाही,याचा आज निर्णय होईल.
राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण वैध आहे की नाही, या मुद्द्यावर ह्या पाचसदस्यीय घटनापीठाकडून पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आज १०० टक्के आरक्षण मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.