तामिळनाडू मध्ये मिचॉंग चक्रीवादळामुळे हाहाकार माजला आहे. नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ५०६० कोटी रुपयांच्या तात्काळ अंतरिम मदत निधीची मागणी केली आहे.
एमके स्टॅलिन यांनी यांनी पत्रात चेन्नई, तिरुवल्लूर,कांचीपुरम, चेंगलपेट या उत्तरेकडच्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा तपशील कळवला आहे. रस्ते, पूल इमारती यांसारख्या पायाभूत सुविधांचे बरेच नुकसान झाले आहे.