आज राज्यात हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात 9 विधेयकं मांडली जाणार आहेत. या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत “शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२०” म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात हजेरी लावली असून ते ते सत्ताधारी बाकावर बसले असल्याचे दिसून आले.