ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु होत असतानाच दिशा सालियन प्रकरणी राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात गुरुवार, ७ डिसेंबर रोजी ऑर्डर येण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुढे येत आहे.
दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने ती छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला, असं सीबीआय तपासात समोर आले होते.
दिशा सालियानच्या मृत्यूच्या वेळी आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता.या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी अशी मागणी सातत्याने काही आमदार करत होते. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी गेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.
दरम्यान, या प्रकरणी राज्य सरकार आता आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करणार आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात हे SIT पथक काम करणार असून या चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची सूत्रांची माहीती आहे.