आज राज्यात हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली. सुरवातीच्या सत्रात जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी आज अजित पवार गटात सहभागी होत सत्ताधारी बाकावर बसले. मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्याने भाजपवरही टीका होऊ लागली असताना उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित विरोध केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहून नवाब मलिक यांच्याबाबत नाराजी बोलून दाखवली आहे. सत्ता येते जाते परंतु देश महत्वाचा असे म्हणत मलिकांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे.
नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत त्यांतून त्यांची मुक्तता झाल्यास आपण जरूर त्यांचे स्वागत करावे मात्र तूर्तास हे आरोप असे पर्यंत त्यांना महायुतीचा भाग न करणे योग्य ठरेल असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हणले आहे.