बॉलिवूडमधले प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन झाले आहे. पोटाच्या कर्करोगामुळे वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते ज्युनियर मेहमूद यांना पोटाचा कर्करोग झाला होता. त्यांचा हा आजार चौथ्या टप्प्यात पोहोचला होता.
ज्युनियर मेहमूद यांनी त्यांच्या राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण, कॅन्सरशी सुरू असलेली ही झुंज ते हरले. ज्युनियर मेहमूद यांनी ‘हाथी मेरे साथी’, ‘कारवां’ आणि ‘मेरा नाम जोकर’सह अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले होते.
ज्युनियर महमूद यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.