पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या एथिक्स कमिटीकडून मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
‘पैसे घेऊन प्रश्न’ विचारण्याच्या आरोपाबाबतच्या प्रकरणाची कालबद्ध चौकशी करण्याची शिफारस समितीने केली होती.या प्रकरणावर लोकसभेत जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली. त्यानंतर आवाजी मतदानाने महुआ यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या समितीने महुआ यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचं म्हटले होते तसेच त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्याची मागणीही केली होती. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना या मुळे मोठा धक्का बसला आहे.