नागपुरात अधिवेशन सुरु असताना आज नागपुरात युवक काँग्रेसचा मोठा मोर्चा विधान भवनाच्या दिशेला निघाला होता . या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. तसेच बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सर्व आंदोलक तरुण आक्रमक झाले. या तरुणांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीसही सतर्क झाले.
पोलिसांनी य आंदोलकांची धरपकड केली. या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील सहभागी झाले होते. नाना पटोले हे ठिय्या आंदोलनावर ठाम होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केली तरी युवकांच्या प्रश्नांवर लढत राहू, असा निर्धार नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. यावेळी ४० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.