एनआयएने अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने आज. पहाटेपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे त्याचबरोबर कर्नाटकातील काही ठिकाणी देखील एनआयए कडून छापे टाकण्यात आले आहेत. या छापेमारीत इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून १४ जणांना ताब्यात घेण्यात आलाय तर शेकडो जणांची चौकशी सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमधे पुण्यातील तिघांचा समावेश आहे. या तिघांपैकी एकजण पुण्यातील कोंढवा भागातील तालाब मस्जीद परिसरात राहणारा आहे तर दोघेजण मोमिनपुरा भागात राहणारे आहेत.जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया अर्थात आयसिस ही सर्वात मोठी दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते.
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या या कारवायांमुळे अनेक विघातक कृत्ये होण्याची शक्यता होती असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. इसिसचे देशभरातील नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एकाच वेळी ही छापेमारी करण्यात आली आहे.
छापेमारी दरम्यान अतिरेक्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, इसिसचे हँडलर्स या सर्वांचा पर्दाफाश केला आहे. देशभरात दहशवादी कारवाया करण्याचा कट उद्ध्वस्त केला आहे. देशात इसिसची विचारधारा रुजवण्याचा डाव या अतिरेक्यांनी आखला होता. पुणे शहरातून हे नेटवर्क चालत होते. या नेटवर्कमधील सहभागी अतिरेक्यांनी आयईडी तयार केले होते