शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी संपली आहे. साक्ष नोंदवण्याचे काम मंगळवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याप्रकरणी नियमित तपासणी सुरु आहे.
गेले काही दिवस शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यासमोर ठाकरे आणि शिंदे गटाची सुनावणी सुरु झाली होती. दोन्ही गटाचे वकील आपला युक्तिवाद करत होते.
दरम्यान विधानसभा अध्यक्ष ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये सुनावणी दरम्यान नाराज झाले. वारंवार तेच तेच प्रश्न विचारून वेळ घालवू नका, ज्या प्रश्नांची उत्तरं मागे देण्यात आली आहेत. तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नका असे अध्यक्षांनी वकिलांना सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे.