केंद्र सरकारच्या निर्यातबंदीविरोधात कांदा व्यापारी आक्रमक झाले आहेत.. नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापा-यांनी बेमुदत लिलावबंदची हाक दिली आहे. .. तोडगा निघेपर्यंत लिलाव बंदच राहणार असल्याची भूमिका व्यापा-यांनी घेतली आहे.
केंद्र सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल 3700 रुपयांचा दर मिळताच निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली असून ह्या [पार्श्वभूमीवर दिल्लीत सोमवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार जाण्याची शक्यता आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. पवार यांनी पीयूष गोयल यांची भेट असून कांदानिर्यात बंदीविरोधात पुनर्विचार करावा अशी मागणी पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकमधील व्यापारी राहणार बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्राने कांदा निर्यात बंदी केल्याने जिल्ह्यातील कांदा लिलाव सध्या बंद आहेत.दिल्लीत होणाऱ्या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
.