मिचॉन्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे बदलले होते पण आता पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाल्याने थंडीचा जोर वाढत आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसाचीही शक्यता आहे. मात्र येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. राज्यात उत्तरेकडील वाऱ्यांमुळे पारा घसरेल आणि काही ठिकाणी थंडी वाढू शकते तसेच येत्या 5 ते 6 दिवसांत मुंबई, पुण्यासह राज्यातील कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे दरम्यान, रात्री जास्त थंड राहतील
येत्या काळात विदर्भ वगळता सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असला तरी पुढच्या २४ तासात अवकाळीच्या पावसाचाही शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात पावसाचा अंदाज आहे. याशिवाय विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.