राज्यात मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादची प्रकरणे पुढे येत असून याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली समिती रद्द करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी १ लाख पेक्षा अधिक लव्ह जिहादची प्रकरणे झाल्याचा दावा केला होता. मात्र, राज्यात वर्षभरात आंतरधर्मीय विवाहांची केवळ ४०२ प्रकरणे घडली आहेत, असा दावा रईस शेख यांनी केला आहे. या बाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि डब्ल्यूसीडी मंत्री आदिती तटकरे यांना पत्र देखील पाठवले आहे.
या तक्रारीमध्ये केवळ दोन विशिष्ट समुदायाची जोडपी नसून, सर्वधर्मीय जोडपी आहेत. त्यामुळे, ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी गठीत केलेली समिती रद्द करा अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.
राज्य शासनाची लव्ह जिहादविरुद्धची समिती गावोगावी जाऊन तक्रार देण्यासाठी लोकांवर दबाव आणत आहे. ही समिती रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीही आज विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना केली आहे. .