आज 10 डिसेंबर 2023 आज वंदनीय मावशी म्हणजेच लक्ष्मीबाई केळकर यांचा तिथीने स्मृतिदिन
मावशींचा जन्म 6 जुलै 1905 म्हणजे आषाढ शुद्ध दशमी या दिवशी झाला.आणि मृत्यू 27 नोव्हेंबर1978 म्हणजे कार्तिक कृष्ण द्वादशी या दिवशी झाला.त्यांचा जन्मदिन संकल्प दिन म्हणून साजरा केला जातो व त्यांचा स्मृतिदिन संपर्क दिन म्हणून साजरा केला जातो.
संकल्प दिनादिवशी संकल्प केला जातो व त्याची पूर्तता वर्षभरात केली जाते.संपर्क दिनाला नवीन नवीन घरात किंवा वेगवेगळ्या संस्था ,संघटना यांच्याशी संपर्क केला जातो.मावशींनी त्यांच्या जीवनात वेगवेगळ्या व्यकींशी व संघटना यांच्याशी संपर्क केला म्हणून तर आज आपल्याला त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष पाहायला मिळतो व त्याच्या फांद्या सर्वत्र पसरलेल्या दिसतात.
मावशींनी आपली संघटना स्थापन करण्यासाठी पहिला संपर्क केला तो शेजारील महिलांशी आणि नंतर संघटना व्यवस्थित करण्यासाठी त्यांनी डॉ.हेडगेवार यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.आणि 1936 साली विजयादशमी या दिवशी राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली.डॉ. हेडगेवार यांच्या सांगण्यावरून पुण्यातील ताई आपटे द्वितीय संचालिका यांची भेट घेऊन आपण करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. अशाप्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेल्या महिला एकत्रीकरणाला भेटी देऊन आपण सर्व मिळून काम करू असे सांगितले.व वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क करून वर्ग व संमेलन घेण्यास सुरुवात केली.
याची प्रचिती म्हणून आज भारतात व भारताबाहेर समितीच्या शाखा सुरू आहेत व वेगवेगळे आयाम चालू आहेत.हे सर्व घडले ते संपर्क झाल्यामुळेच.म्हणूनच आज संपर्क दिन हा वेगवेगळ्या संघटनां शी ,घराशी संपर्क करून साजरा केला जातो व त्यादिवशी अधिकतम उपस्थितीची शाखा घेतली जाते.
सौ सुनीता धोपाटे
वैदेही शाखा,कराड
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र