⛳
इथल्या माती मधे उगवती दुर्वांकुराचे तुरे आणिक तलवारीची पाती…
इथेच जन्म घेते दुर्गा
आणि
इथेच खेळते भगवती !
खर आहे.. भारतीय संस्कृतीतल्या ती ची ही अनेक रुप आपल्याला
आपल्या सनातन इतिहासा पासूनच आढळताना दिसतात.
अगदी इंद्राणी,गार्गी पासुन सुरु झालेला हा प्रवास अनेक वळणावर कार्यकर्तुत्वाची विद्युलता बनुन तळपताना दिसतो.
ब्रिटिश कालखंडातील असेच एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे राष्ट्र सेविका समीतीच्या आद्य संचालिका वंदनीय लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर.
६ जुलै १९०५ साली वंदनीय मावशींचा जन्म नागपूर येथे यशोदाबाई आणि भास्करराव दाते
ह्या दांपत्याच्या पोटी झाला.
वर्धा येथील पुरषोत्तम रावांशी विवाह झाल्यावर कमल दाते ह्या सौ लक्ष्मीबाई पुरषोत्तम केळकर झाल्या.
अत्यंत लहान वयातच वंदनीय मावशी केळकरांवर वैधव्याचा घाला पडला.
पोटी लहान अपत्य असताना त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर आली.
आणि असे असताना ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार ह्यांनी हिंदूराष्ट्र पुनर्निर्मीतीसाठी निर्माण केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आणि त्याची माहिती त्यांच्या पहण्यात आली.
आपण ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करावे ह्या हेतूने वंदनीय मावशी केळकरांनी डॉक्टरांची भेट घेतली.
डॉक्टर हेडगेवारान्नी मावशी केळकरांना हिंदू स्त्री सक्षम होण्यासाठी, तीनी राष्ट्र कार्यात येण्यासाठी महिलांची संघटना बांधण्याचे सुचवले.
आणि २५ ऑक्टोबर १९३६ साली राष्ट्र सेविका समीतीची स्थापना झाली.
सुशिला!सुधिरा! समर्था!समेत:!!
हे सुत्र घेउन स्थापन झालेल्या राष्ट्र सेविका समीतीचे कार्य हळूहळू विस्तारत गेले.
फाळणीच्या काळ्या कालखंडातील वंदनीय मावशी केळकरांनी स्वतः कराचीला जाऊन तेथील सेविकांचे मनोधैर्य वाढवले.
राष्ट्र सेविका समीतीच्या अनेक आयामांची बांधणी केली.
नवरात्री पर्वात रामायणावरील प्रवचने मावशी स्वतः देत असत.
अंगणवाड्या, शाखा,
पाळणाघरे, खेळघरे, सेवा प्रकल्पातून राष्ट्र सेविका समीती कार्यरत आहे.
वंदनीय मावशींनी लावलेल्या छोट्याशा रोपाला आज अनेक शाखा फुटल्या आहेत.
समितीचा विस्तार जागतिक पातळीवर पोचला आहे.
४३५० नियमितशाखा,आणि ८५५ सेवाकार्य करीत राष्ट्र सेविका समीती आजमितीला जगातील सर्वात मोठी स्त्री संघटना म्हणून ओळखली जाते.
वर्ध्या सारख्या छोट्याशा शहरात लावलेला हा वेलु बघताबघता बहरुन आलाय, फुलुन आलाय..
त्या राष्ट्र सेविका समीतीच्या कार्यास आणि
वंदनीय मावशी केळकरांच्या पवित्र स्मृतीस आज वंदनीय मावशी केळकरांच्या स्मृतिदिनी मन:पूर्वक वंदन !
© उल्का मोकासदार, पुणे
सौजन्य – इंटरनेट,शिवशक्ती संगम