दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आता अखेर एसआयटी स्थापन केली जाणार आहे. राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दिशा सालियानच्या मृत्यूच्या वेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता.या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी अशी मागणी सातत्याने काही आमदार करत होते. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी गेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.अखेर आज मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत.