पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा मधल्या पोलिस ठाण्यावर आज आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. . यामध्ये सुरक्षा दलाचे ४ जवान ठार झाले आहेत तर २८ नागरीक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील डेरा इस्माईल खानमधील या स्थानिक पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी तेहरीक-ए- जिहाद पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे.असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेले वाहन पोलीस ठाण्याच्या गेटला येऊन धडकले. यानंतर मोठा स्फोट झाला. तसेच यानंतर काही दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात ४ जण ठार तर २८ नागरीक जखमी झाले. पोलिसांनी देखील गोळीबार सुरू केला आहे.