पंढरपूरच्या विठ्ठलाच्या प्रसादाबाबत एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा लाडू आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यादरम्यान हा अहवाल सादर करण्यात आला आहे.
प्रसाद म्हणून मिळणारा हा लाडू निकृष्ट दर्जाचा असून तो ज्या कारखान्यात तयार केला जातो, तेथे स्वच्छतेचा अभाव आहे. तसेच या लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो, असा इशारा लेखापरीक्षण अहवालात नोंदवला आहे. या अहवालाच्या माध्यमातून विठ्ठल मंदिर समितीचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे.
नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चा वर्ष २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सादर करण्यात आला आहे.
2020-21 मध्ये ज्या संस्थेला प्रसादाचा लाडू बनवण्याचं कंत्राट देण्यात आले होते ,त्या संस्थेला लाडू बनवण्यासंदर्भात निकष लावण्यात आले होते.पण प्रत्यक्ष तपासणी अहवालामध्ये तफावत आढळून आली आहे .
होणाऱ्या परिणामास लाडू बनवणाऱ्या बचत गटाबरोबर मंदिर समितीची सुद्धा तेवढीच जबाबदारी असेल, असा इशारा लेखापरीक्षण करणाऱ्या पुण्याच्या ‘बीएसजी अँड असोसिएट्स’ने नोंदवला आहे.