ठाकरे गटाचे नेते मुंबईत झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींसोबत असल्याचे फोटो भाजप नेते नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले आहेत.बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता हा ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करत होता असा आरोप करत नितेश राणेंनी कारवाईची मागणी केली आहे. यावर एसआयटी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.
आम्ही ट्रेलर देण्याचं काम केले असून सखोल चौकशी केली जावी असं सांगत नितेश राणे यांनी पार्टी मातोश्रीमध्ये=पण होती का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच सुधाकर बडगुजरला तातडीने अटक करावे तो बाहेर राहिल्यास पुरावे नष्ट करेल अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.