शिवसेना अपात्रता प्रकरणात विरोधकांकडून हे सगळे दावे-प्रतिदावे सुरु असताना आज आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार राहुल नार्वेकर सुनावणी घेत होते. या प्रकरणी दोन्ही बाजूने जवळपास युक्तिवाद पूर्ण झाला असून सुनावणी अंतिम टप्प्यात पोचली आहे. असे असताना राहुल नार्वेकर यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेत तीन आठवड्यांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली होती.
“20 डिसेंबरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मला २ लाख ७१ हजार पानांचे वाचन करायचे आहे. त्यामुळे 30 डिसेंबरपर्यंतचा काळ कमी पडत आहे. . त्यामुळे आणखी तीन आठवडे द्या, असे राहुल नार्वेकर अर्जात म्हणाले होते. त्याचा विचार करत कोर्टाने राहुल गांधींना १० जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा दिवस खूप मोठा आणि महत्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण भवितव्य या सुनावणीच्या निकालावर अवलंबून आहे. हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर उद्धव ठाकरे यांचं मोठे नुकसान होणार आहे. पण हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे यांचं सर्वात मोठे नुकसान आहे.कारण या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकते