राजस्थान विधानसभेत १९९ पैकी ११५ जागा जिंकून सत्तेवर आलेल्या भाजपने आज राज्यात सत्ता स्थापन केली. प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेले भाजपचे भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयपूरमध्ये राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. तसेच त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली.
भाजप आमदार प्रेमचंद भैरवा आणि जयपूर राजघराण्याशी संबंधित असलेल्या दिया कुमारी या दोघांनी आज राजस्थानचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजस्थान भाजपमधील दिग्गज नेते उपस्थित होते. यात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंदिया उपस्थित होते.तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या सोहळ्याला हजेरी लावत भजनलाल शर्मायांना मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या