मुंबईतील 93 च्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. दाऊदवर विषप्रयोग झाल्याचा दावा केला जात आहे.
पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रविवारी रात्री बऱ्याचशा शहरांमधील इंटरनेट डाऊन झाले असून डाऊन डिटेक्टरवरील माहितीनुसार संध्याकाळी ७ नंतर कराची, लाहोर, रावळपिंडी येथील इंटरनेट डाऊन झाले. यामागे दाऊद इब्राहिम हे कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला फूड पॉयजनिंग झाले असून त्याला १०२ डिग्री ताप होता. अनेकवेळा उल्ट्या झाल्या. सुरक्षा कारणांमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. मात्र उपचारांसाठी त्याच्या कराचीस्थित डॉक्टरांच्या टीमलाच घरी बोलवण्यात आले होते. अशी माहिती समोर येत आहे.