राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आज चार राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली आहे. एनआयएच्या पथकांनी कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे.
दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कशी संबंधित प्रकरणात एटीएस आणि महाराष्ट्र पोलिसांची मदत घेत एनआयएचे पथक एकाच वेळी छापे टाकत आहेत. ISIS मॉड्यूलविरोधात हे धाडसत्र असून काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या १५ दहशतवाद्यांना ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध भागातून अटक केल्यानंतर अजूनही शोध सुरू ठेवण्यात आला होता. त्यानंतर एनआयएच्या पथकाने पुणे, मीरा रोड, महाराष्ट्रातील ठाणे आणि कर्नाटकातील बेंगळुरूसह अन्य ४४ ठिकाणी छापे टाकले आहेत. .