देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्याचे दिसत आहे. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कर्नाटकात देखील नागरिकांनासाठी नियमावली जारी केली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात सोमवारी एका दिवसात 13 नवीन कोविड -19 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अनेक महिन्यांनंतर राज्यात दुहेरी आकड्यांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद असून हे सर्व १३ रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. त्यापैकी 1 रुग्ण रुग्णालयात दाखल आहे तर इतर सर्व संक्रमित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तापमानातील चढउतार आणि इतर कारणांमुळे या वर्षी फ्लूच्या प्रादुर्भावात वाढ अपेक्षित आहे. त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच केंद्राने सोमवारी राज्यांना अॅडव्हायजरी जारी कडून कोविड परिस्थितीबाबत राज्यांनी सतत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.