नवी दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होत आहे. बैठकीला इंडिया आघाडीचे सगळे नेते उपस्थित राहणार आहेत. अशोक हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या दिल्लीतील प्रस्तावित बैठकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह सर्व प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. बैठकीचा अजेंडा अद्याप अधिकृत जाहीर झाला नसला, तरी खासदार निलंबन व जागावाटप यांसारखे मुख्य मुद्दे असतील. विरोधी आघाडीची ही चौथी बैठक असेल.
ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेच्या एका गटाचे नेते उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, आरजेडीचे तेजस्वी यादव आणि द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन आदी बहुतांश नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा समावेश असेल.
तसेच उद्धव ठाकरे,सपा नेते अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश, फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि आरएलडीचे जयंत चौधरी उपस्थित राहणार आहेत.