सध्या राज्यातील काही भागात थंडीचा पारा चांगलाच घसरला असून गारठा वाढल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील किमान पारा खाली घसरला आहे. नाताळपर्यंत कोकणात देखील तापमानाचा किमान पारा खाली येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमान १२ अंशांखाली गेले आहे. सर्वात कमी किमान तापमानाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा प्रथमच यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळीवर आल्याने महाराष्ट्र गारठला आहे.पुढील २-३ दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.