उपसभापती नीलम गोऱ्हें काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांना सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडीओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला होता. मुळात धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या उपसभापती धंगेकरांना बोलू देत नाहीत हा मुद्दा चुकीचा आहे. या प्रकरणात सुषमा अंधारे यांच्या विरोधात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. त्याबाबत नीलम गोऱ्हे यांनी निर्वाणीचा इशारा सुषमा अंधारे यांना दिला आहे.
धंगेकर इकडे सदस्य नसताना मी कसे बोलू दिले नाही. याचे कोडे उलगडलेले नाही. अज्ञानी लोकांकडून चूक झाल्यास मी समजू शकते पण जे स्वत:ला ज्ञानी समजतात अशावेळी त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे तरी सौजन्य असू नये. त्या व्यक्तीला जाणीव करून दिली पाहिजे. सर्वज्ञानी सुषमा अंधारेंनी या कृत्याबाबत दिलगिरी व्यक्त करायला हवी. आठ दिवसांत त्यांचे दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन. असे नीलम गोऱ्हे यांनी म्हंटले आहे.