सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील विश्रामगृहामधील 6 कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांना राखीव ठेवण्यात यावेत तसेच त्याचे आरक्षण विधिमंडळ सचिवालयामार्फत करण्यात यावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या मागण्यांबाबत आज विधानभवनाथ बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानमंडळाचे माजी सदस्य जोगेंद्र कवाडे, रामकृष्ण पाटील, प्रकाश गजभिये, रामभाऊ गुंडिले, डॉ. रमेश गजबे, बाळासाहेब साळुंके, दिनानाथ पडोळे, वसंतराव शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने वैद्यकीय उपचारांचा खर्च व मुंबई येथे कामासाठी आल्यानंतर तात्पुरत्या निवासाच्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले.