भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना हा आज पार्ल येथील बोलंड पार्कवर होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा आठ विकेट्सनी पराभव करत मालिकेत 1 – 1 अशी बरोबरी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यावर मालिकेचा विजेता ठरणार आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यातील प्रमुख बदल म्हणजे तिलक वर्माच्या ऐवजी संघात रजत पाटीदारला संधी मिळू शकते.मात्र गोलंदाजीत बदलाची शक्यता फार कमी आहे. गोलंदाजीची मदार कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार यांच्यावर असू शकते.
तिलक वर्मासोबतच ऋतुराज गायकवाड देखील चांगली कामगिरी करू शकलेला नाही. मात्र तो संघातील आपली जागा कायम ठेवेल कारण त्याला दुसरा पर्यायच नाहीये.
हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ४. ३० वाजता सुरु होणार आहे. बोलँड पार्क फलंदाजीसाठी अनुकूल मानले जात असल्यामुळे प्रथम फलंदाजी करणारा संघ वरचढ ठरू शकतो.