देशभरात पुन्हा कोरोनाच्या व्हायरसने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासून अमेरिका, चीन आणि सिंगापूर या देशांमध्ये ‘जेएन1’ या नव्या व्हेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते, आता भारतात त्याचा प्रवेश झाला आहे. हिवाळा सुरू झाल्याने आणि जेएन1 मुळे अनेक देशांमध्ये संसर्ग वाढल्याचे WHO ने म्हटले आहे
ओमीक्रॉननंतर जे व्हेरियंट आले त्यापासून फार धोका पाहायला मिळाला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने ‘जेएन1’ याला व्हेरियंट म्हणून घोषित केले आहे. परंतु हा सौम्य स्वरूपाचा व्हायरस आहे.हे. ताप येणे, नाक गळणे, जुलाब होतात यापुढे फार काही होत नाही. यापासून फुफुसाला संसर्ग होण्याचा धोका नसल्याचे ज्येष्ठ कोव्हिड तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले आहे, मात्र त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा. तसेच प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी आणि वृद्धांनी जास्त काळजी घ्यावी असे त्यांनी सुचविले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्याबाबतच्या उपयांबाबत महत्वाची माहिती दिली. नागपूर इथे अधिवेशन संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोरोना संदर्भात जे काही उपाय करायचे आहेत. त्याबाबत आरोग्य यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत कुठल्याही परिस्थितीत त्याचा प्रसार वाढ होणार नाही याची काळजी सरकार घेईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.