काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा स्वतःच्या बाष्कळ बडबडीमुळे अडचणीत सापडले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या खिसेकापू किंवा पनौती या टिप्पणीवरून आज राहुल गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. त्यांनी सातत्याने अशाप्रकारची वक्तव्ये करणे टाळले पाहिजे, असे हायकोर्टाने म्हटले आहे.
दिल्ली हायकोर्टात आज राहुल गांधी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी तसेच राजकीय नेत्यांकडून गैरवर्तन रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकांवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी कार्यवाहक सरन्यायाधीश मनमोहन म्हणाले, राहुल गांधी यांची ही विधाने योग्य नाहीत.
दिल्ली हायकोर्टाने निवडणूक आयोगाला आठ आठवड्यांत या प्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये निवडणूक रॅली काढताना पीएम मोदींवर खिसेकापू, पनौती मोदी अशी टीका केली होती.