आज आणि उद्या भाजपची दिल्लीत बैठक होणार असून यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीती बाबत चर्चा होणार आहे. तसेच मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कामांचा आढावा देखील घेतला जाणार आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ही दोन दिवसांची बैठक बोलावली असल्याचे सांगितले जात आहे. . लोकसभा निवडणूक, विकसित भारत संकल्प अभियान, विधानसभा निवडणूक समीक्षेसह अनेक मुद्यांवर चर्चा होईल. जे.पी.केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचल्या आहेत का नाही याचाही आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. बैठकीत सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह प्रदेशअध्यक्ष, प्रदेश संघटन मंत्री, प्रदेश प्रभारी, सह प्रदेश प्रभारी आणि सर्व मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत .बैठकीनंतर संघटन महामंत्र्यांसोबत बैठक होईल. या दरम्यान ‘विकसित भारत संकल्प अभियान’ समीक्षा केली जाईल. त्याशिवाय बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत 325 जागा जिंकण्याची रणनिती ठरवली जाईल. विजयाची हॅट्रिक करुन इतिहास रचण्याचा भाजपाचा इरादा आहे.
दुपारी ३ वाजल्यापासून भाजप मुख्यालयात बैठकीला सुरुवात होणार आहे.