गोपनीय कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम कोर्टाने इम्रान खान आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना जामीन मंजूर केला आहे.सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही नेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती सरदार तारिक मसूद यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती अतहर मिनाल्ला आणि सय्यद मन्सूर अली शाह यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश जारी केला आहे.
हे सिफर प्रकरण राजकीय दस्तऐवजाशी संबंधित असून ते इम्रान खान यांच्याकडून गायब झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. . फेडरल प्रोब एजन्सीच्या आरोपपत्रात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.