बीडमध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगेंची आज निर्णायक इशारा सभा होणार आहे. दुपारी 1 वाजता ही सभा होणार आहे…या सभेच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांकडून १२५ मराठा आंदोलकांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. बीड बाय पासवर ही सभा होणार असून, २४ डिसेंबरच्या डेडलाईनवर जरांगे ठाम आहेत, त्यामुळे आज जरांगे काय निर्णय घेणार, आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण शहरात पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
या सभेसाठी तब्बल पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सभेला राज्यभरातील मराठा आंदोलक आणि मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत.