जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात तीन नागरिक मृतावस्थेत आढळल्यानंतर काही दिवसांनी, माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या चर्चा आहेत.
पूंछ जिल्ह्यात तीन नागरिक मृतावस्थेत आढळल्यामुळे त्या सोमवारी सुरनकोटला जाणार होत्या. त्यांनी तेथे जाऊ नये याकरता त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.
२१ डिसेंबर रोजी जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दोन लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. या हल्ल्यासंदर्भात चौकशीसाठी सुरक्षा दलांनी शुक्रवारी सकाळी आठ नागरिकांना ताब्यात घेतलं. या आठ नागरिकांपैकी तिघांचा टोपा पीर परिसरात मृतदेह आढळून आला आहे. .