अयोध्येतले राम मंदिराचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात पोचले आहे. त्यापूर्वी ३० डिसेंबरला तिथल्या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर मोदी अयोध्येत रोड शो घेणार असून नंतर एक सभाही घेणार आहेत. रेल्वे स्थानकावर मोदींच्या हस्ते वंदे भारत आणि अमृत भारत या दोन रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे.
. मोदी हे ३० डिसेंबरला अयोध्येत येणार असून यावेळी ते विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांचे उद्घाटन करतील. विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांच्यातील अंतर १५ किलोमीटरचे आहे.विमानतळावरील कार्यक्रम झाल्यावर पंतप्रधान मोदी याच मार्गावरून रोड शो करत रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचणार असल्याची माहिती अयोध्येचे जिल्हा न्यायदंडाधिकारी नितीशकुमार यांनी दिली आहे.