वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा अजूनही इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही. मात्र काहीच होत नसेल तर आम्ही लोकसभेच्या 48 जागा मोठ्या ताकदीने लढवू, असे काल प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते. मात्र आज नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर झालेल्या राजकीय समीकरणाचा उलगडा करत धक्का दिला आहे.
उद्धव ठाकरे आणि आमची आधीच युती झाली असून आमच्या दोघात एक गोष्ट ठरली आहे. शिवसेने आणि काँग्रेस किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तरी शिवसेना आणि वंचितने 50-50 जागा लढवण्याचे आमचे ठरले आहे. लोकसभेच्या 24 जागा उद्धव ठाकरे आणि 24 जागा आम्ही लढणार अशी आमच्यात अंडरस्टँडिंग झाली आहे, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. .