‘न्यूज क्लिक’ या वृत्तसंस्थेवर चीन समर्थनार्थ प्रोपेगेंडा चालवण्यासाठी पैसे मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली होती. ‘न्यूज क्लिक’चे एचआर विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी सरकारी साक्षीदार होण्यासाठी दिल्ली न्यायालयात धाव घेतली आहे
.ऑक्टोबर महिन्यात दिल्ली पोलिसांनी न्यूज क्लिक प्रकरणांत चक्रवर्ती आणि प्रबीर पुरकायस्थ यांच्यासह अनेक पत्रकारांच्या घरावर छापेमारी केली होती. न्यूज क्लिकला कोणाकडून निधी मिळाला याबाबत सक्तवसुली संचालनालयाने तपास केला होता.
दरम्यान,‘न्यूज क्लिक’चे एचआर विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी दिल्ली न्यायालयात अर्ज दाखल केला असून याप्रकरणी सरकारी साक्षीदार व्हायला तयार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. याप्रकरणी माफी मिळावी आणि माझ्याकडे यासंबंधी महत्त्वाची माहिती असून ती आपण दिल्ली पोलिसांना सांगू असे चक्रवर्ती अर्जामध्ये म्हणाले आहेत. त्यानंतर न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाला चक्रवर्ती यांची साक्ष नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत.